तलाठी नसताना खासगी व्यक्तींकडून कारभार; नागरिकांची कागदपत्रे हाताळणाऱ्यांना अधिकार कुणाचा?
नांदेड (शेख मुख्तार) : नांदेड तालुक्यातील अनेक तलाठी सज्जांमध्ये ‘पंटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासगी व्यक्तींचा वावर असल्याची चर्चा असून, हे कथित पंटर नागरिकांची कागदपत्रे हाताळत असल्याचे आरोप आहेत. एवढेच नव्हे, तर तलाठी गैरहजर असताना संबंधित व्यक्तींकडूनच नागरिकांची कामे हाताळली जात असल्याने महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तलाठ्यांना अधिकृत सहाय्यक नेमण्याची तरतूद आहे का? असल्यास त्यांचा नियुक्ती आदेश कुठे आहे? संबंधित व्यक्तींना नागरिकांची कागदपत्रे स्वीकारण्याचा किंवा महसुली प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला? जमीन, फेरफार, वारस नोंद व सातबारा यांसारख्या संवेदनशील कागदपत्रांचा व्यवहार अनधिकृत व्यक्तींच्या हातून होत असेल तर नागरिकांच्या कागदपत्रांची जबाबदारी कोणाची? तलाठी कार्यालयात सरकारी कर्मचारी एक आणि कारभार पाहणारा दुसराच असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणाच्या आदेशाने सुरू आहे, याचा खुलासा महसूल प्रशासनाने करणे गरजेचे आहे. तहसीलदारांनी सज्जानिहाय चौकशी करून ‘पंटर’ अधिकृत आहेत की अनधिकृत, हे स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
क्रमशः
Leave a Reply