📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचे रऊफ जमीनदार यांच्याकडून अभिष्टचिंतन!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा; मान्यवरांची उपस्थिती

नांदेड (शेख मुख्तार) : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा. शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन केले. यावेळी कदम यांना निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व सार्वजनिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रऊफ जमीनदार यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी कदम यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि मार्गदर्शन नव्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कमलकिशोर कदम यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले असून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. तसेच मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी काम केले आहे. महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात संस्थात्मक कार्याचा विस्तार करण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे.

या अभिष्टचिंतन प्रसंगी रऊफ जमीनदार यांच्यासोबत निखिल नाईक, स. लखनसिंघ लांगरी, खदिर कुरेशी, शे. सरदार, शे. अतिक बिल्डर, सदाम भाई, वसीम भाई, सत्तार भाई, शेख युसूफ, साहिल खान, खाजा भाई, निखिल कांबळे, उदय गोरे, हफिज तौफिख, हाजीभाई, कामरान खान, नूर पठाण, निसारभाई, रविभाई, आरेफ भाई, सादेख भाई आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान, त्यांच्याशी संवाद आणि त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन घेण्याची परंपरा जपण्याच्या भावनेतून हा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!