📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

हदगावच्या ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत २२ सप्टेंबरला!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृहात सोडत; ५९ जागा खुल्या प्रवर्गासाठी तर ६० पदे महिलांसाठी राखीव

तामसा (अर्जुन जोशी) : हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारी महत्त्वाची प्रक्रिया आता समोर आली आहे. तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे. हदगाव तहसील कार्यालयातील पंचायत समिती सभागृहात ही आरक्षण सोडत पार पडणार आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे? : अनुसूचित जाती — २६.  अनुसूचित जमाती — १४, नागरिकांचा मागासवर्ग — १९, खुला प्रवर्ग — ५९, महिलांसाठी राखीव — ६० पदे

आरक्षण सोडतीनंतर कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेसाठी संबंधित नागरिक, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि इच्छुकांनी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता निर्धारित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार सय्यद उमर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!