सार्वजनिक गणेश मंडळाचा आदर्श उपक्रम; ग्रामस्थांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा
हदगाव (सदानंद सोनाळे) : मनाठा येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे ना डीजे, ना ढोल-ताशांचा गजर, तर अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्यानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या वाहनातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी भक्तिभावाने सहभाग घेत गणरायाला निरोप दिला. विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही ध्वनिप्रदूषणाचा गोंगाट न करता शांतता, शिस्त आणि भक्तीचा संदेश देत मंडळाने विसर्जन पार पाडले. त्यामुळे या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी उपसरपंच मारुती बोईनवाड, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल सोनाळे, सुनील पाध्ये, संतोष पाटील यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या विसर्जनावेळी उपस्थित भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
मनाठ्यात ‘गणरायाला’ भावपूर्ण निरोप; ना डीजे, ना ढोल-ताशा, शांततेत गणेश विसर्जन
फॉन्ट:
Leave a Reply