📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी विशेष शिबिर

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणपत्रक-प्रमाणपत्रातील नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ दुरुस्तीची संधी; ३० सप्टेंबरला राजर्षी शाहू विद्यालयात आयोजन

नांदेड (शेख मुख्तार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळामार्फत नांदेड जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रावरील नाव, आईच्या नावातील तसेच जन्मतारीख व जन्मस्थळातील दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर विभागीय मंडळाच्या दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, नांदेड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वसंतनगर, नांदेड येथील राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, आईच्या नावामध्ये तसेच जन्मतारीख व जन्मस्थळामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांची तपासणी केली जाणार आहे. प्रस्तावामध्ये त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दुरुस्त करून, योग्य प्रस्ताव स्वीकारण्यात येणार असून त्यानंतर प्रवेश निर्गम रजिस्टर तपासून योग्य प्रस्तावानुसार प्रवेश निर्गम रजिस्टरमध्ये आवश्यक नोंद करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे.

शाळांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन : शिबिरासाठी संबंधित शाळांनी स्वतःच्या शाळेतील माहितीगार जबाबदार प्रतिनिधीसह मूळ अभिलेख व आवश्यक प्रवेश निर्गम रजिस्टर घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे. मंडळ कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही शिबिरास उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नांदेड यांना शिबिरात आवश्यक स्वाक्षरी व शिक्क्यासाठी स्वतः किंवा संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राजर्षी शाहू विद्यालयाला विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना : शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्या राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वसंतनगर, नांदेड यांना शिबिरासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लाईट, पाणी आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्याचा समावेश आहे. तसेच पालक व विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, मुख्याध्यापक/प्राचार्य प्रतिनिधींनी परिपूर्ण प्रस्तावांसह सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

संदर्भ : लातूर विभागीय मंडळाचे जा.क्र. लाविमं/प्रमाणपत्र/१९९६, दिनांक २५/०९/२०२६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!