📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

बैलपोळ्याच्या उत्साहात मराठा आरक्षणाचा संदेश; नांदेडमध्ये अनोख्या पद्धतीने व्यक्त झाला रोष

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

 


नांदेड (शेख मुख्तार) : पारंपरिक उत्साह, श्रद्धा आणि जल्लोषात नांदेड जिल्ह्यात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असलेल्या बैलांची सजावट करून त्यांची पूजा करण्यात आली. गावागावांत बैलांची मिरवणूक, आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यात आला.

यंदाच्या बैलपोळ्याला मात्र पारंपरिक उत्साहासोबत मराठा आरक्षणाचा मुद्दाही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. काही बैलांच्या अंगावर मराठा आरक्षणाच्या मागणीचे संदेश लिहिण्यात आले होते. त्यामध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ तसेच ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ असे संदेश ठळकपणे लिहिलेले दिसून आले.

बैलपोळ्याच्या निमित्ताने सजवलेल्या बैलांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीचा संदेश देण्यात आल्याने या अनोख्या उपक्रमाची परिसरात चर्चा रंगली. पारंपरिक सणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

दरम्यान, बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सजवले, पूजा केली आणि नैवेद्य दाखवला. त्यामुळे परंपरा, शेतकरी संस्कृती आणि सामाजिक प्रश्नांचा अनोखा संगम यंदाच्या बैलपोळ्यात नांदेडमध्ये पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!