📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

NICUमध्ये AC बंद; नवजात बालकांच्या जीवाशी खेळ? विष्णुपुरी रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

दोन दिवसांपासून क्रमांक ७चा AC बंद; उकाड्याने नातेवाईक, कर्मचारी त्रस्त, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संताप

नांदेड (शेख मुख्तार) : विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) पुन्हा एकदा गैरसोयीच्या कारणाने चर्चेत आला आहे. NICUमधील क्रमांक ७चा AC गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याची तक्रार समोर आली असून, त्यामुळे विभागातील वातावरण उकाड्याने त्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. NICU हा नवजात बालकांसाठी अत्यंत संवेदनशील विभाग आहे. येथे उपचार घेणारी बाळे वैद्यकीयदृष्ट्या नाजूक अवस्थेत असतात. त्यामुळे उपचाराच्या वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याला विशेष महत्त्व असते. मात्र, याच विभागातील AC दोन दिवस बंद राहणे ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. AC बंद असल्यामुळे नवजात बालकांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचारी उकाड्याने त्रस्त असल्याच्या तक्रारी आहेत. आपल्या बाळाच्या उपचारासाठी रात्रंदिवस रुग्णालयात थांबलेल्या पालकांना या गैरसोयीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. AC बंद पडून दोन दिवस उलटले असताना अद्याप तो पूर्ववत का करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. NICUसारख्या संवेदनशील विभागातील उपकरणे बंद पडल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बंद असलेला AC दुरुस्त करावा. तोपर्यंत नवजात बालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी पर्यायी तापमान नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. नवजात बालकांच्या उपचाराच्या ठिकाणी मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यातही दिरंगाई होत असेल, तर रुग्णालय प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!