नांदेड (शेख मुख्तार) : व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या वतीने नांदेड जिल्हा व शहरातील सदस्य नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, आज जिल्हा व शहरातील सदस्यांचे सभासद नोंदणी फॉर्म भरण्यात आले. मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या आदेशानुसार ही सदस्य नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे नांदेड जिल्हाध्यक्ष शेख याहीया यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहर व जिल्ह्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत सदस्यांनी नोंदणी फॉर्म भरले. यावेळी संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना एकत्रित आणण्याबरोबरच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील डिजिटल मीडिया प्रतिनिधी सक्रियपणे सहभागी होणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल मीडिया प्रतिनिधी एकत्र : नांदेड जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील डिजिटल मीडिया प्रतिनिधींना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Leave a Reply