‘सेवा संकल्प अभियान मासा’अंतर्गत ‘अंगण मिलन सेवा’ उपक्रम उत्साहात
तामसा (अर्जुन जोशी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान मासा’अंतर्गत हदगाव पूर्व मंडळ भाजपाच्या वतीने तामसा येथे ‘अंगण मिलन सेवा’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत भाजप नांदेड उत्तर जिल्हा सचिव तथा अभियानाच्या प्रभारी सुप्रिया मुनेश्वर आणि महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ममता अर्जुन जोशी यांनी तामसा येथील विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील गरोदर माता लाभार्थी महिलांचाही सन्मान करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला भाजप नांदेड उत्तर जिल्हा सचिव तथा अभियानाच्या प्रभारी सुप्रिया मुनेश्वर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ममता अर्जुन जोशी तसेच तालुका उपाध्यक्ष ज्योती राजू शिंगणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना मोपलवार, सुरेखा कुलकर्णी, अरुणा काशीटवार, मीना मोपलवार, संगीता कुंडगुलवार, प्रिया पुंडे, ज्योती रासमल्लेवार, प्रियंका सोळंके, सय्यद सुलताना यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांच्या संगोपनासह महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात होत असलेल्या कार्याचा गौरव करून त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्यात आले. चिमुकल्यांना चॉकलेटचे वाटप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
Leave a Reply