📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

बाबूराव साळवे यांच्यावर नवी जबाबदारी; शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

नांदेड (सदानंद सोनाळे) : शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बाबूराव गणपत साळवे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष सुभाष शंकरराव गायकवाड यांनी २१ जून २०२६ रोजी नियुक्तीपत्र देत साळवे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष सुमित वजाळे आणि अनिल मिसाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. साळवे यांचा नियुक्तीचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे. नांदेड जिल्ह्यातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तसेच वंचित घटकांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. संबंधित घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासह संघटनात्मक पातळीवर काम करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. याशिवाय शिवसेनेच्या विचारधारेचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच संघटनेत सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा मासिक लेखी अहवाल शिवसेना जनसंपर्क कार्यालय, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे सादर करणे आवश्यक असल्याचेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. बाबूराव साळवे यांच्या नियुक्तीनंतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील झोपडपट्टी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना संघटितपणे मांडण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!