📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

पदवीधरांच्या हक्कांसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी करा! — रऊफ जमीनदार यांचे आवाहन

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

२३ ऑक्टोबर रोजी मतदान; पसंतीक्रमांक १ नोंदवून सहकार्य करण्याचे उमेदवार डॉ. पाटील यांचे पदवीधर मतदारांना आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार असलेले डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रऊफ जमीनदार यांनी केले आहे. पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगार युवकांच्या समस्या, शिक्षक-प्राध्यापकांच्या मागण्या, कर्मचारी हित आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. पाटील यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधताना डॉ. पाटील यांनीही २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात पसंतीक्रमांक १ नोंदवून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. मतदारांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपली ताकद असल्याचे सांगत त्यांनी सर्व पदवीधर मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या जाहीरनाम्यात समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले आहे. युवकांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी परवडणाऱ्या सुविधा, २४ तास अभ्यासिका व ई-ग्रंथालय, रोजगाराच्या संधी आणि कौशल्यविकास यांसारख्या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. वाढती बेरोजगारी आणि रोजगारासाठी युवकांना करावा लागणारा संघर्ष लक्षात घेता या प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे.

शिक्षक व प्राध्यापकांचे वेतन, अनुदान, थकबाकी, तासिका आणि कंत्राटी प्राध्यापकांचे प्रश्न, यूजीसी वेतनश्रेणी, सीएएस पदोन्नती आणि पीएचडी वेतनवाढ यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच रिक्त पदांची भरती, पेन्शनची सुरक्षा आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, पीकविमा मदत, पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्या यांचा सामना करावा लागतो. या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका डॉ. पाटील यांच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे.

पदवीधर मतदारांना उद्देशून डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “मी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार आहे. आपणास विनम्र विनंती आहे की, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात पसंतीक्रमांक १ नोंदवून मला आपले सहकार्य करावे. आपला विश्वास आणि पाठिंबा हीच माझी ताकद आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा!” या आवाहनातून डॉ. पाटील यांनी पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत त्यांचा विश्वास आणि पाठिंबा मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही शिक्षण, रोजगार, शिक्षकांचे प्रश्न, कर्मचारी हित आणि ग्रामीण विकासाशी संबंधित मुद्द्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळवून देण्याची संधी आहे. त्यामुळे मतदारांनी जाहीरनाम्यातील मुद्दे लक्षात घेऊन मतदान करावे आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन रऊफ जमीनदार यांनी केले आहे.

“आपला विश्वास आणि पाठिंबा हीच माझी ताकद आहे,” या भावनेतून डॉ. पाटील यांनी मतदारांना सहकार्याचे आवाहन केले असून, २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे आता पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!