नांदेड(शेख मुख्तार) : वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात EV चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनधारक नागरिकांना आपल्या वाहनांची चार्जिंग सुविधा उपलब्ध नांदेड व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या तसेच परिसरातून प्रवास करणाऱ्या EV वाहनधारकांसाठी हे चार्जिंग स्टेशन उपयुक्त ठरणार आहे. आवश्यकता असलेल्या नागरिकांनी उपलब्ध सुविधेचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू झालेली ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Leave a Reply